Unauthorized Sugarcane Transportation : अनधिकृत ऊस वाहतुकीविरोधात कारवाई करा; अन्यथा ‘रास्ता रोको’चा ‘वंचित’चा इशारा 

Unauthorized Sugarcane Transportation : अनधिकृत ऊस वाहतुकीविरोधात कारवाई करा; अन्यथा ‘रास्ता रोको’चा 'वंचित'चा इशारा 

0
Unauthorized Sugarcane Transportation : अनधिकृत ऊस वाहतुकीविरोधात कारवाई करा; अन्यथा ‘रास्ता रोको’चा 'वंचित'चा इशारा 
Unauthorized Sugarcane Transportation : अनधिकृत ऊस वाहतुकीविरोधात कारवाई करा; अन्यथा ‘रास्ता रोको’चा 'वंचित'चा इशारा 

Unauthorized Sugarcane Transportation : शेवगाव: तालुक्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या ऊस वाहतुकीमुळे (Unauthorized Sugarcane Transportation) नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, दिवसेंदिवस ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. दर आठवड्याला किमान एक तरी अपघाती मृत्यू (Accidental Death) या बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केला आहे. 

अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’

परिवहन विभागाच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दांत निषेध

या अनियंत्रित व अनधिकृत ऊस वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी गुरुवारी (ता.१८) शेवगाव येथील आंबेडकर चौकात केलेल्या आंदोलनादरम्यान केली. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत परिवहन विभागाच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा (Unauthorized Sugarcane Transportation)

येणाऱ्या मंगळवारपर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या अनधिकृत वाहनांवर कारवाई झाली नाही, तर त्याच दिवशी शेवगाव येथील क्रांती चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रा. चव्हाण यांनी दिला आहे.