Unconscious : संगमनेर : नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमिगत गटार (Underground Drainage) कामादरम्यान आज कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी एक दुर्घटना घडली. गटारीत काम करत असताना पालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा (Municipal Employee) श्वास गुदमरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले काही पालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकही गटारातील विषारी वायूमुळे बेशुद्ध (Unconscious) पडले. या घटनेने संपूर्ण संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत विविध पदांसाठी भरती
मदतीसाठी धावलेल्यांचाही श्वास कोंडला
संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी शहरात जागोजागी भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका पालिका कर्मचाऱ्याचा गटारात जीव गुदमरला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा आणि काही स्थानिक नागरिकांचाही गटारातच श्वास कोंडला.
अवश्य वाचा : बनावट कागदपत्रे तयार करून लाटली शिष्यवृती; दोघांविरूध्द गुन्हा दाखल
स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य (Unconscious)
घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका कर्मचाऱ्याला संगमनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर स्थानिक नागरिकांपैकी दोघाजणांना संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.