Union Budget 2024:अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत मोदी सरकारचा ३.० चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे.

0
Union Budget 2024:अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज
Union Budget 2024:अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज

नगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज संसदेत मोदी सरकारचा ३.० चा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने,१ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून आलेले नाहीत. मात्र, आज सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना १० लाख रूपयांचे उच्च शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा अर्थमंत्रा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली.

नक्की वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय;सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये जाण्यावर बंदी नाही

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज जाहीर (Union Budget 2024)

निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरूण, रोजगार यांच्यासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे. ही मदत विशेषतः अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल,जे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर दिले जाणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी! शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पक्षामधून हकालपट्टी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून पाच योजनांसाठी पंतप्रधान पॅकेज जाहीर(Union Budget 2024)


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच योजनांसाठी पंतप्रधान पॅकेज जाहीर केले. त्यांचा उद्देश रोजगार आणि प्रशिक्षण मजबूत करणे हा आहे. यासाठी सरकारने दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणासाठी १. ५४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here