नगर : भाजप खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटात प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज झाल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत.
नक्की वाचा : ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्या जळून खाक
उन्मेष पाटील यांच्या हाती शिवबंधन (Unmesh Patil)
उन्मेष पाटील यांनी मंगळवार (ता.२) थेट मुंबईत दाखल होताच खासदार संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाणार हे निश्चित झाले होते. त्यानंतर त्यांचा आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे.
अवश्य वाचा : लोकसभा निवडणुकीत माझा फोटो,नाव कुणीही वापरू नयेत-मनोज जरांगे
पक्ष प्रवेशानंतर उन्मेश पाटील म्हणाले की… (Unmesh Patil)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.भाजपला माझ्या कामाची किंमत नाही, एका भावाने दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, हा मला विश्वास असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटात सामील होत असल्याचं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.