Unseasonal Rain : जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; १०१ कच्च्या घरांची पडझड

Unseasonal Rain : जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; १०१ कच्च्या घरांची पडझड

0
Unseasonal Rain : जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; १०१ कच्च्या घरांची पडझड
Unseasonal Rain : जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; १०१ कच्च्या घरांची पडझड

Unseasonal Rain : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rains), गडगडाटासह वादळी वारा, वीज पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी २४ आणि २५ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) आंबा, केळी, संत्रा, खरबूज फळबागा तसेच कांदा, बाजरी, गहू, भोपळा, टोमॅटो, भुईमूग पिकांचे नुकसान झाले आहे.

अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया

वीज पडून चार जणांचा मृत्यू

अवकाळीने मे महिन्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत. याशिवाय १९ मोठी आणि इतर १३ असे ३२ जनावरे दगावली आहेत. तर १०१ कच्च्या घरांची पडझड झाली आहे.

नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे

विजांच्या कडकडाटासह पाऊस (Unseasonal Rain)

जिल्ह्यात २४ व २५ मे रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात नगर, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा, अकोले, कोपरगाव आणि संगमनेर तालुक्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.