Unseasonal Rain : नगर : जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावत शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गुरुवारी (ता. १९) अनेक भागांत वादळी वाऱ्यासह (Stormy Winds) गारपीट झाल्याने काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला. दरम्यानगुरुवारी (ता. १९) काही भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शेत पिकाचे नुकसान (Damage to Agricultural Crops) झाले आहे.
नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल
साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
जिल्ह्यातील राहुरी, नेवासे, राहाता, अकोले, नगर आणि पाथर्डी तालुक्यांतील एकूण ४१ गावांमधील ७ हजार ३५२ शेतकऱ्यांचे सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे नुकसान (Unseasonal Rain)
नगर तालुक्यातील ५ गावांमध्ये १ हजार ४४५ शेतकऱ्यांचे ९३० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील ४१ गावांतील १६० शेतकऱ्यांनाही ३३ टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे. राहुरी तालुक्यातील ८ गावांमध्ये ३५५ हेक्टरवरील ७०० शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांच्या आत नुकसान झाले असून, १ हजार ७२६ हेक्टरवरील ४ हजार ३१५ शेतकऱ्यांचेही ३३ टक्क्यांच्या आत नुकसान नोंदवले गेले आहे. या तालुक्यात एकूण ५ हजार १५ शेतकऱ्यांचे २ हजार ६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील ६ गावांमध्ये १९४ शेतकऱ्यांचे ३८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यातील ३ गावांमधील २५ शेतकऱ्यांचे १६.५ हेक्टरवरील पिकांचेही ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आजही काही भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शेत पिकाचे नुकसान झाले आहे.



