Unseasonal Rain : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून अवकाळीची शक्यता!

Unseasonal Rain : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून आवकाळीची शक्यता!

0
Unseasonal Rain : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून आवकाळीची शक्यता!
Unseasonal Rain : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून आवकाळीची शक्यता!

Unseasonal Rain : नगर : जिल्ह्यात खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात झाली असतानाच अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) डोके वर काढले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या (Rain) सरी कोसळणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (Meteorological Department) दिले आहे. प्रामुख्याने शुक्रवार, (ता.१५) नोव्हेंबरला हवामान (Weather) विभागाने नगर जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे.

अवश्य वाचा : विकासकामे न करता विरोधकांचे वेगळ्याच विषयावर राजकारण : मोनिका राजळे

वादळी वारा, विजांसह पावसाची शक्यता (Unseasonal Rain)

राज्याच्या दक्षिण भागापासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, पालघर, मध्य महाराष्ट्र, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा यासह विदर्भातील गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान वादळी वारा, विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यादरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.