Unseasonal Rain : कर्जत: कर्जत शहर (Karjat City) आणि तालुक्यात मंगळवारी (ता.२०) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पुन्हा एकदा जोरदार हजेरी दिली. दुपारपासूनच ढगाळ वातावरण (Cloudy Weather) होते. संध्याकाळी साडेसहा वाजल्यानंतर मध्यम स्वरूपाच्या पावसास सुरुवात झाली. मंगळवारी मिरजगाव मंडळ क्षेत्रात सर्वाधिक ६९.५ मिमी पाऊस झाला असून राशीन मंडळ क्षेत्रात अवघा १० मिमी पावसाची नोंद झाली. मे महिन्यात कर्जत तालुक्यात आठ दिवसांत सरासरी ११२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ
अवकाळी पावसाची मान्सून सारखी हजेरी
यंदा मे महिन्याच्या मध्यानमध्येच अवकाळी पावसाने मान्सून सारखी हजेरी दिली आहे. कर्जत तालुक्यात आठ दिवसांत तब्बल ११२ मिमी पावसाची नोंद कृषी विभागाच्या दफ्तरी आहे. मंगळवारी दुपारपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा होता. दुपारी काही सरी बरसल्या. मात्र, संध्याकाळी साडेसहानंतर काही भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मध्यम स्वरूपाच्या सरी जवळपास दोन तास पडल्या. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत संततधार सुरूच होती. मंगळवारी सरासरी ३५.९ मिमी पाऊस कर्जत तालुक्यात पडला. यात सर्वाधिक पाऊस मिरजगाव मंडळ क्षेत्रात पडला. तर सर्वात कमी राशीन भागात झाला. या पावसाने बाभूळगाव दुमाला आणि शिंपोरा भागातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी शीतल पाचारणे यांनी दिली. यासह पाटेवाडी येथील किराणा दुकानावर झाड कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सदरच्या बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती पाचारणे यांनी दिली.
अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?
कर्जत तालुक्यात मंडळ निहाय पडलेला पाऊस (Unseasonal Rain)
मंगळवारी कर्जत तालुक्यात मंडळ निहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे (कंसात मे महिन्यात एकूण पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये) : कर्जत : ३२ मिमी (९९), राशीन : १०.८ मिमी (१०८), भांबोरा : २८.८ मिमी (१३७), कोंभळी : ४५ मिमी (१४३), मिरजगाव : ६९.५ मिमी (१२५), माही : ४७.५ मिमी (१८४), कुळधरण : ३८ मिमी (५५), वालवड : ३२ मिमी (९९), खेड : ३६ मिमी (१०१) आणि कोरेगाव १८ मिमी (७०.२) पावसाची नोंद झाली आहे.