Weather Update: राज्यात हिवाळा सुरु असतानाही पुन्हा एकदा थंडीचा जोर कमी झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट आलं आहे. पुणे शहरासह (Pune City) जिल्ह्यात घाटमाथा आणि परिसरात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी विरळ धुकेही पडेल,असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे.
राज्यभरात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे शहर परिसरासह घाटमाथ्यावर अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. २९ डिसेंबरपासून अवकाळी पाऊस थांबेल,असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
पुणे शहरासह घाटमाथ्यावर पावसाची शक्यता (Weather Update)
पुणे शहरासह जिल्ह्यात घाटमाथा आणि परिसरात पुढील तीन दिवस मेघगर्जना,वादळी वारे,विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी विरळ धुकेही पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यभरात दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे शहर परिसरासह घाटमाथ्यावर अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. सकाळच्या सुमारास काही प्रमाणात धुकेही पडत असल्याचं दिसून येत आहे. २९ डिसेंबरपासून अवकाळी पाऊस थांबेल,असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
‘या’ ठिकाणी यलो अलर्ट जारी (Weather Update)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,सध्या बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भागाकडून महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे वाहू लागले आहेत. परिणामी, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. २७,२८,२९ डिसेंबर रोजी राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक (घाटमाथा), अहिल्यानगर, पुणे, पुणे (घाटमाथा), छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.