Unseasonal Rain:राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं,हवामान विभागाचा अंदाज काय ?

0
Unseasonal Rain:राज्यातील 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं,हवामान विभागाचा अंदाज काय ?
Unseasonal Rain:राज्यातील 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं,हवामान विभागाचा अंदाज काय ?

Unseasonal Rain : राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यामध्ये उन्हाचा चटका जाणवत असल्याचे चित्र आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसत आहे. आज सलग पाचव्या दिवशी नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच जालना, बीड या जिल्ह्यातही देखील अवकाळी पाऊस झाला आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आता पुन्हा पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार   

राज्यात पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Unseasonal Rain)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,राज्यात पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी!’किंग कोहली’चा कसोटी क्रिकेटला अलविदा

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज बीड,गेवराई पाटोदा वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडगडाटासह पाऊस बरसत आहे. तर जालना ,धाराशिव आणि भोकरदन मध्ये देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.