UPSC : पारनेर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नुकत्याच घेतलेल्या नागरिक उड्डयन महानिर्देशालयातील ऑपरेशन अधिकारी पदाची परीक्षा पारनेर तालुक्यातील रांधे येथील प्रसाद शोभा भाऊसाहेब आवारी (Prasad Shobha Bhausaheb Awari) हे उत्तीर्ण झाले आहेत. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये (DGCA) ऑपरेशन अधिकारी म्हणून नावाची नोंद केली आहे.
नक्की वाचा : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत मिळविले यश
प्रसादने अतिशय खडतर परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण करत हे यश मिळविले आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चेंबूर येथील श्री नारायण गृह हायस्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण विद्याविहार येथील एस.के, सोमय्या कॉलेज, अभियंत्रिकी शिक्षण भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले.

अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना
देशात २०व्या क्रमांकाने उत्तीर्ण (UPSC)
भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी भारतीय सैन्य अधिकारी पदासाठी १२ एसएसबी मुलाखती दिल्या. मात्र, यात त्याला यश आले नाही. निराश न होता त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षी युपीएससीची तयारी सुरू केली. त्याच वर्षी २०१८ एअर फायर असिस्टंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली. दोन वर्ष अभ्यास करून ज्यनिअर एक्झिकेटिव्ह गट ब अधिकारी पदापर्यंत पोहोचले. मात्र, त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची खुणगाठ मनाशी बांधली होती. त्या दृष्टीने त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. २०२४मध्ये ऑरेशन अधिकारी गट अ या पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल काल (ता. ९) जाहीर झाला. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ते देशात २०व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या यशाबाबत प्रसाद आवारी म्हणाले, “हे यश माझ्यासाठी खुप महत्त्वाचे आहे. या यशाचे श्रेय तो सर्व कुटुंबाला, माझ्या अधिकारी व मित्र परिवाराला देतो.”



