UPSC : नगर : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -२०२५ मध्ये देशातील एकूण ९५८ उमेदवार (candidate) यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील ६० हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी (ता.६) जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषीकेश आलासे यांनी ६१ वा, आकाश त्रिवेदी यांनी ७३ वा, गौरव चोपडा यांनी ८३ वा, सायली पगार यांनी ८७ वा तर दिक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे (UPSC)
हृषीकेश आलासे (६१), आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोप्रा (८३), सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१).



