UPSC 2023 Result : २०२३ च्या यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; निकालात महाराष्ट्राचा डंका 

राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा देशात रँक एक आला आहे. विशेष बाब म्हणजे केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या या परीक्षेत महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

0
UPSC 2023 Result
UPSC 2023 Result

नगर : यूपीएससी परीक्षा २०२३ (UPSC 2023) दिलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज (ता.१६) यूपीएससी परिक्षेचा निकाल (UPSC 2023 Final Result) जाहीर केला आहे. हा निकाल उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा देशात रँक एक आला आहे. विशेष बाब म्हणजे केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या या परीक्षेत महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नक्की वाचा : ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची नवी आरती प्रदर्शित

महाराष्ट्रातून अनिकेत हिरडे अव्वल (UPSC 2023 Result)

यूपीएससीचा जाहीर झालेल्या या निकालात अनिकेत हिरडे, प्रियंका सुरेश मोहीते, अर्चित डोंगरे हे महाराष्ट्रातील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. अनिकेत हिरडे या विद्यार्थ्याने ८१ वा रॅंक, प्रियंका सुरेश मोहीते या विद्यार्थिनीने ५९५वा रॅंक आणि अर्चित डोंगरे या विद्यार्थ्याने १५३ वा रॅंक मिळवून घवघवीत यश संपादन केलं आहे.२०२३ मध्ये यूपीएससीच्या ११४३ पदांसाठी जाहीरात निघाली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांनतर आज हा निकाल जाहीर करण्यात आलाय.

अवश्य वाचा : मराठी साहित्यातील मानाचं पान असलेला ‘फकिरा’ चित्रपट रुपेरी पडद्यावर

यूपीएससीच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम (UPSC 2023 Result)

केंद्रीय लोक सेवा आयोगाची ही परिक्षा ११४३ जागांसाठी झाली होती. यातील १०१६ उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव याने देशात   प्रथम, अनिमेष प्रधान याने दुसरा तर अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच चौथ्या क्रमांकांचा मानकरी पीके सिद्धार्थ रामकुमार ठरलेला आहे. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये २८४६ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यातील जवळपास ७० उमेदवार हे महाराष्ट्रातील होते. या परीक्षेत १८० आयएएस, २०० आयपीएस आणि ३७ आयएफएस पदांसाठी भरती निघाली होती. हा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here