UPSC : कर्जत : उच्चपदस्थ अधिकारी म्हणूनच काम करायचे या ध्येयाने पेटलेल्या सुनील कदम यांनी बीएसएफमध्ये (BSF) असिस्टंट कमांडर पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पुन्हा परीक्षा देत नुकत्याच झालेल्या यूपीएससी (UPSC) परीक्षेत ७२७ रँक पटकावत आयआरएस (IRS) पदासाठी पात्र ठरले. सुनील कदम बारडगाव दगडी (ता.कर्जत) येथील युवकाने स्वतःची जिद्द ठेवत सातत्य, चिकाटी आणि कठोर मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण केले.
नक्की वाचा : स्नेहसंमेलन म्हणजे कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारी सुवर्णसंधी : रामदास महाराज शास्त्री
अनेकांनी उडवली खिल्ली
सुनील कदम बारडगाव दगडी (ता.कर्जत) येथील शेतकरी कुटुंबातला युवक. सुनील याने यापूर्वी देखील यूपीएससी परीक्षेत यश मिळवत बीएसएफमध्ये असिस्टंट कमांडर पदावर आपले नाव कोरले होते. मात्र मनात ध्येय आणि जिद्द प्रशासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करण्याचा त्यांचा मानस त्यांना या सेवेत स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी त्यावेळी खिल्ली देखील उडवली. मात्र सुनील कदम यांनी पुन्हा नव्याने यूपीएससी परीक्षा देण्याचा धाडसी निर्णय घेतला.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण (UPSC)
नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी ७२७ रँक पटकावत आयआरएस पदावर आपले नाव कोरले. मनात जिद्द, चिकाटी आणि त्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम इतिहास घडवू शकतात याची प्रचिती ग्रामीण भागातील तरुणांना दिली. बारडगाव सारख्या खेडेगावातून येत एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची कठीण परीक्षा उत्तीर्ण करणे त्यांचा हा यशस्वी प्रवास सर्वसामान्य कुटुंबासाठी प्रेरणा ठरत आहे. त्यांच्या या निर्णयात आणि यशाच्या या प्रवासात कदम कुटुंबासह त्यांच्या पत्नी विनया कदम यांनी देखील मोलाची साथ दिली असल्याचे उदगार सुनील कदम यांनी काढले. त्या देखील पुणे महानगरपालिकेत सहायक विधी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.



