UPSC Prelim: यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पूर्वपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर

यूपीएससीच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा २०२५ आणि आयएफएस २०२५ चे आयोजन २५ मे २०२५ रोजी करण्यात आले आहे.

0
UPSC
UPSC

नगर : यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) येत्या २०२५ वर्षात होणाऱ्या विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक (Time Table) जाहीर केले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार पूर्व परीक्षा २५ मे ला होणार आहे. उमेदवारांना हे वेळापत्रक upsc.gov. in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

नक्की वाचा : ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार   

२५ मे ला होणार पूर्वपरीक्षा (UPSC Prelim)

यूपीएससीच्या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा २०२५ आणि आयएफएस (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस) २०२५ चे आयोजन २५ मे २०२५ रोजी करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिसूचना २२ जानेवारी २०२५ ला जारी करण्यात येईल. उमेदवारांना ११ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

२२ ऑगस्टपासून सुरू होणार मुख्य परीक्षा (UPSC Prelim)

संयुक्त जिओ-सायंटिस्ट, सीडीएस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सीआयएसएफ, सीबीआय, एनडीए, आयईएस/आयएसएस आणि इतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तर मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा २०२५ साठी २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नोंदणी करता येईल. २५ मे रोजी पूर्वपरीक्षा होईल. नागरी सेवा मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा १६ नोव्हेंबरला सुरू होईल.

अवश्य वाचा : चेन्नईचा हैदराबादवर दणदणीत विजय;तुषार देशपांडेची तुफान खेळी  

अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येतील. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्वपरीक्षा होईल. २६ जूनला मुख्य परीक्षा पार पडेल. संयुक्त जीओ सायंटिस्ट पूर्व परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी तर मुख्य परीक्षा २१ जूनला आहे. संयुक्त वैद्यकीय सेवापरीक्षा २० जुलैला होणार आहे. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा २०२५ चे आयोजन ९ फेब्रुवारी आणि संयुक्त भू वैज्ञानिक परीक्षेचे आयोजन देखील ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. तर मुख्य परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. नागरी सेवेची मुख्य परीक्षा २२ ऑगस्टपासून ५ दिवस असणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी यूपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here