नगर : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज २०२५ साठीची जाहिरात (Add) प्रसिद्ध केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Service) भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय वन सेवा यासह विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यासाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही ११ फेब्रुवारी आहे.या पदांसाठी अर्ज करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल. या वर्षी आयोगाने नागरी सेवा परीक्षेसाठी ९७९ जागांसाठी जाहिरात काढली आहे.
नक्की वाचा : पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली
अर्ज करण्याची शेवटची तारीख (UPSC Exam 2025)
या सगळ्या पदांसाठी उमेदवारांना अर्जाची नोंदणी ११ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करायची आहे. यूपीएससीने परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत आणि आता उमेदवारांना तयारी सुरू करण्यासाठी वेळ मिळाला आहे. यावेळी यूपीएससी,सीएसई बाबत अधिसूचना लवकर प्रसिद्ध करण्यात आली आहे, जेणेकरून उमेदवारांना अधिक वेळ मिळेल आणि त्यांना परीक्षेची चांगली तयारी करता येईल.
अवश्य वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आजपासून भारतीय नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२५ सोबत,भारतीय वन सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. दोन्ही परीक्षा यूपीएससीद्वारे आयोजित केल्या जातात आणि उमेदवार दोन्हीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आपला नोंदणी फॉर्म दिलेल्या मुदतीत ऑनलाइन सबमिट करावा.
प्राथमिक परीक्षा २५ मे ला होणार (UPSC Exam 2025)
मागील वर्षी यूपीएससीने सीएसईसाठी एकूण १,०५६ आणि भारतीय वन सेवेसाठी १५० रिक्त पदांची अधिसूचना जारी केली होती. यंदाच्या परीक्षेसाठी रिक्त पदांची संख्या अजून जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु यंदाही ही संख्या मोठी असेल, अशी उमेदवारांची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या परीक्षेचे मुलाखतीचे सत्र आता सुरू असून ते एप्रिलमध्ये संपणार आहे. यूपीएससी सीएसई २०२५ची प्राथमिक परीक्षा २५ मे रोजी होणार आहे आणि त्यानंतर मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील.