UPSC Results 2025:युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर,शक्ती दुबे देशात प्रथम तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला  

0
UPSC Results 2025:युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर,शक्ती दुबे देशात प्रथम तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला  
UPSC Results 2025:युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर,शक्ती दुबे देशात प्रथम तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला  

UPSC Results 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल (Results) नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये शक्ती दुबे (Shakti Dubey) हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर युपीएससी परीक्षेत हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे.

नक्की वाचा : मराठवाड्यात तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या 

पुण्याचा अर्चित महाराष्ट्रात पहिला (UPSC Results 2025)

अर्चित हा पुण्यातला रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा डंका वाजला आहे. पुणे,ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये,मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.अर्चित डोंगरे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे. तो पुण्यातला रहिवासी आहे. देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे.

अवश्य वाचा :  स्वारगेट अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.अजय मिसर यांची नियुक्ती

युपीएससी आयोगाकडून २०२४ च्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना upsc.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे हिने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. १००९ उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये, ३३५ सर्वसाधारण, १०९ ईडब्लूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी,८७ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत.

युपीएससीत परीक्षेत मुलींची सरशी (UPSC Results 2025)

२०२५ पर्यंत या युपीएससी परीक्षांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर,७ जानेवारी २०२५ पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती.युपीएसीकडून २०२४ च्या परीक्षेसाठी आयएएस,आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती काढण्यात आली होती. युपीएससी परीक्षेत ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा क्रमांक पटकावला आहे.तर ठाण्याच्याच अंकिता पाटीलने ३०३ वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे, मुलींनी देखील यंदाच्या परीक्षेत आपली सरशी दाखवून दिली आहे.