Utkarsha Rupwate : श्रमिकांच्या घामाला दाम मिळो; उत्कर्षा रुपवते यांनी कामगारांना भेटून दिल्या शुभेच्छा

Utkarsha Rupware | आज (ता. १) कामगार दिन साजरा केला जात आहे त्याचे औचित्य साधत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.

0
Utkarsha Rupwate : श्रमिकांच्या घामाला दाम मिळो; उत्कर्षा रुपवते यांनी कामगारांना भेटून दिल्या शुभेच्छा
Utkarsha Rupwate : श्रमिकांच्या घामाला दाम मिळो; उत्कर्षा रुपवते यांनी कामगारांना भेटून दिल्या शुभेच्छा

Utkarsha Rupwate | संगमनेर : ‘श्रमाला लाभो मोल सर्वदा..अन् घामाला दाम मिळो..या हातांना काम मिळो अन्… कामाला सन्मान मिळो … कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा‘, अशा शब्दांत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी कामगार दिनाच्या निमित्ताने खास शैलीत शुभेच्छा दिलेल्या आहेत. हा शुभेच्छा संदेश सध्या व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी कामगारांशी संवाद साधत या शुभेच्छा दिल्या. आज (ता. १) कामगार दिन साजरा केला जात आहे त्याचे औचित्य साधत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. 

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार (Utkarsha Rupwate)

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या उत्कर्षा रुपवते यांना ‘ प्रेशर कुकर असे चिन्ह जाहीर झालेले आहे. लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. सद्य परिस्थितीत त्या मतदारसंघ पिंजून काढत मतदारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. त्या मतदारसंघातील सर्व घटकातील मतदारांच्या भेटी घेत आहेत. रुपवते कुटुंबाची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे. 

नक्की वाचा : अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची सुटका

प्रेमानंद रुपवते यांचा वारसा (Utkarsha Rupwate)

बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमानंद रूपवते यांच्या कार्याचा वारसा लाभलेल्या उत्कर्षा रुपवते या मागील तीन वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात दौरे करत आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर होताच रुपवते यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून काँग्रेसचे चिन्ह तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे व काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो हटवले आणि सध्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर त्या निवडणूक लढवत आहेत. 

माजी मंत्री दादासाहेब रुपवते, प्रेमानंद रूपवते, माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन रुपवते या राजकारणात सक्रिय आहेत. राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्या देखील राहिलेल्या आहेत. अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेले असून शिर्डी मतदारसंघात महिला मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे तर शिर्डी मतदार संघात बौद्ध बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचाही मोठा फायदा रुपवते यांना होऊ शकतो.

२००९ साली रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातूनच पराभूत व्हावे लागले होते त्यामुळे मतदारांमध्ये त्याबाबत देखील काही प्रमाणात सल आहे. त्याचा देखील सकारात्मक फायदा रुपवते यांना होण्याची चिन्हे आहेत. सर्व समाजांना बरोबर घेत सर्वसमावेशक राजकारण करण्याची दादासाहेब रुवपते यांची राजकारणाची पद्धत त्यांची नात उत्कर्षा रुपवते यांच्यात दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here