Utkarsha Rupwate : उत्कर्षा रुपवते यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद 

Utkarsha Rupwate : उत्कर्षा रुपवते यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद 

0
Utkarsha Rupwate
Utkarsha Rupwate : उत्कर्षा रुपवते यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद 

Utkarsha Rupwate : संगमनेर: शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) राखीव झाल्यानंतर ही चौथी निवडणूक आहे. गेल्या तीन निवडणुकीत एकाही पक्षाने महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. प्रथमच वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा प्रेमानंद रुपवते यांच्या रुपाने महिलेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिर्डीत तिरंगी लढत होत आहे. उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांचा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू आहे. मतदारांकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure), महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. त्यांना सर्वच तालुक्यातून जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Utkarsha Rupwate
Utkarsha Rupwate : उत्कर्षा रुपवते यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद 

हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या

अनेक वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ म्हणून ओळख (Utkarsha Rupwate)

रुपवते कुटुंबीय गेली अनेक वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख राज्यभर होती. दादासाहेब रुपवते हे उत्कर्षा रुपवते यांचे आजोबा होते. दादासाहेब हे मोठे राजकारणी होते. 1978 मध्ये त्यांनी आमदारकी देखील भूषवली होती. तसेच 1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीमध्ये त्यांनी दोनदा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद देखील भूषवले. तसेच उत्कर्षा रुपवते यांचे वडील स्वर्गीय प्रेमानंद रुपवते हे देखील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांत गणले जात होते. त्यांचाच वारसा आता उत्कर्षा रुपवते या पुढे चालवत आहे. रुपवते परिवाराला मानणारा मतदार या मतदारसंघात आहे. त्यामुळे रुपवते यांच्या राजकीय वारसदार म्हणून मतदार उत्कर्षा रुपवते यांच्याकडे पाहत आहे. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मोठा राजकीय वारसा लाभलेल्या उत्कर्ष रुपवते या उच्चशिक्षित आहेत. काँग्रेस पक्षात असताना त्यांनी समाजकारणाला जास्त प्राधान्य दिले. त्यामुळे आजही त्या जनमानसात ओळखल्या जातात. काँग्रेसमध्ये असताना गाव पातळीवर त्यांनी पक्षाचे चांगले संघटन निर्माण केले होते. महिला आयोगाच्या सदस्य म्हणून काम पाहताना त्यांनी महिलांचे प्रश्न सोडविले आहे. रुपवते या प्रचारात थेट महिला मतदारांपर्यंत जात आहे. त्यांना महिला मतदारही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.

Utkarsha Rupwate
Utkarsha Rupwate : उत्कर्षा रुपवते यांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद 

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

४ मे रोजी प्रकाश आंबेडकर यांची सभा (Utkarsha Rupwate)

शिर्डी मतदारसंघात रामदास आठवले यांची आरपीआयही महायुतीबरोबर आहे. येथून बौध्द उमेदवार दिला जात नाही, यावर अनेकदा आठवलेंच्या कार्यकर्त्यांना नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा फायदा रुपवते यांना होईल, असे बोलले जाते. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची चांगली ताकद आहे. त्याचा फायदा आता वंचितच्या उमेदवार म्हणून उत्कर्षा रुपवते यांना होईल आहे. तर प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघात जास्तीत सभा घेणार आहेत. शनिवारी ४ मे रोजी प्रकाश आंबेडकर यांची श्रीरामपूर येथे ‘संविधान निर्धार सभा’ होत आहे. त्याचा मोठा फायदा रुपवते यांना होणार आहे. या मतदारसंघात मागासवर्गीय, मुस्लिम समाजाचा एकगठ्ठा मतदान आहे. हे मतदान मिळविण्यासाठी रुपवते यांची जोरदार तयारी प्रचारावरून दिसून येत आहे. हे हक्काचे मतदान घडवून आणण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here