Utkarsha Rupwate : उत्कर्षा रूपवते यांना आमदार कपिल पाटील यांचा जाहीर पाठिंबा

Utkarsha Rupwate : उत्कर्षा रूपवते यांना आमदार कपिल पाटील यांचा जाहीर पाठिंबा

0
Utkarsha Rupwate
Utkarsha Rupwate : उत्कर्षा रूपवते यांना आमदार कपिल पाटील यांचा जाहीर पाठिंबा

Utkarsha Rupwate : संगमनेर : शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांना शिक्षक मतदारसंघातील आमदार कपिल पाटील यांनी शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी (Shirdi Lok Sabha Elections) जाहीर पाठिंबा दिला. यामुळे उत्कर्षा रूपवते शिक्षक वर्गाचा पाठिंबा मिळाल्याने उत्कर्षा रूपवते यांची राजकीय ताकद वाढली असून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) बळ वाढले आहे.

हे देखील वाचा : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल

प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद

महायुतीकडून खासदार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीतून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या दोघांसमोर वंचित आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांनी आव्हान उभे केले आहे. रुपवते यांनी मतदारसंघात प्रचारादरम्यान दौरे करत असताना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर अल्पावधीतच त्यांनी मिळवलेली लोकप्रियता आणि आजी – माजी पेक्ष्या एक पर्याय म्हणून रुपवते यांच्याकडे जनता पाहत आहे.

नक्की वाचा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ

लोकसभा विजयाची नांदी असल्याचे भाष्य (Utkarsha Rupwate)

सोमवारी (ता.७) संगमनेर येथे शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रूपवते यांना भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. शिर्डी लोकसभा उमेदवार उत्कर्ष रूपवते यांनी आमदार कपिल पाटील यांनी दिलेल्या पाठिंबाबद्दल सांगितले की ही लोकसभा विजयाची नांदी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here