Utkarsha Rupwate : पंधरा दिवसानंतरही हल्ल्यातील आरोपी अद्याप मोकाटच

Utkarsha Rupwate : पंधरा दिवसानंतरही हल्ल्यातील आरोपी अद्याप मोकाटच

0
Utkarsha Rupwate
Utkarsha Rupwate : पंधरा दिवसानंतरही हल्ल्यातील आरोपी अद्याप मोकाटच

Utkarsha Rupwate : अकोले: शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांच्या वाहनावर अकोले तालुक्यातील चितळवेढे येथील घाटात अज्ञातांकडून दगडफेक करुन जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेला १५ दिवस होऊनही हल्ल्यातील आरोपींना (Accused) राजूर पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.३०) वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे तसेच राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, उपनिरिक्षक कावळे यांच्याशी बैठक करुन चर्चा करण्यात आली. तसेच इतरही मागण्यांचे निवेदन दिले.

नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी

उत्कर्षा रुपवते यांच्या वाहनावर हल्ला झालेल्या घटनेला आता पंधरा दिवस उलटून गेले. तरी अद्यापही पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. याच अनुषंगाने गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार व राजूर पोलिसांशी बैठक करुन आरोपींना तत्काळ अटक व्हावी. तसेच सुगाव येथील पाण्यात बुडून मयत झालेल्या गणेश देशमुख यांना मदत व शहिदाचा दर्जा मिळावा, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घ्यावे, अकोले तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरु करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.

हे देखील वाचा: माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल

कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (Utkarsha Rupwate)

याप्रसंगी वंचितचे तालुकाध्यक्ष रवी पवार, शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे, सचिन खरात, दीपक गायकवाड, चंद्रकांत पवार, अनुराधा आहेर, सुरेश जाधव, गणेश गुरुकुले, सतीष भालेराव, संतोष गावंडे, प्रवीण कोंडार, किशोर रुपवते, प्रवीण देठे अदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here