Utkarsha Rupwate : काँग्रेसच्या व्यासपीठावर वंचितच्या उत्कर्षा रुपवते; चर्चांना उधाण

Utkarsha Rupwate : काँग्रेसच्या व्यासपीठावर वंचितच्या उत्कर्षा रुपवते; चर्चांना उधाण

0
Utkarsha Rupwate : काँग्रेसच्या व्यासपीठावर वंचितच्या उत्कर्षा रुपवते; चर्चांना उधाण
Utkarsha Rupwate : काँग्रेसच्या व्यासपीठावर वंचितच्या उत्कर्षा रुपवते; चर्चांना उधाण

Utkarsha Rupwate : संगमनेर : वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) नेत्या उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. संगमनेर शहरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या यशोधन कार्यालयाच्या परिसरात शनिवारी (ता. ११ ) स्वतंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या वेळी रुपवते या व्यासपीठावर दिसल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. पक्षीय राजकारणात या निर्णयाचा काय अर्थ लावावा, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नक्की वाचा : लव्ह जिहाद, धर्मांतर व लँड जिहाद रोखण्यासाठी नाथ जागृती यात्रा : योगी बालकनाथ महाराज

यामागे मोठे राजकीय तर्कवितर्क सुरू

उत्कर्षा रुपवते, वंचित बहुजन आघाडीतील एक महत्त्वाची आणि प्रभावी महिला नेतृत्व, त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा काँग्रेसच्या एका सार्वजनिक सभेत सहभाग हा केवळ व्यक्तिगत पातळीवरची कृती आहे की यामागे मोठे राजकीय समीकरण आहे, याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या कार्यक्रमावेळी माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या सह कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत रुपवते या व्यासपीठावर बसलेल्या दिसल्या. त्यामुळे ज्या काँग्रेसमधून त्यांची सुरुवात झाली त्याच घरात येण्याची तयारी सुरु आहे का ? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु झाली आहे. सध्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जवळीक वाढत असल्याचीही चर्चा आहे. आगामी निवडणुकांसाठी संभाव्य युतीच्या तयारीत हा एक महत्त्वाचा पाऊल असेल का, असा सवाल अनेक राजकीय विश्लेषकांनी उपस्थित केला आहे.

अवश्य वाचा : अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!

त्यांच्या या कृतीने राजकीय वर्तुळात खळबळ (Utkarsha Rupwate)

वंचित बहुजन आघाडी ही दलित, ओबीसी, अल्पसंख्याक वर्गाचा आवाज मानली जाते. त्यामुळे उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेसच्या व्यासपीठावरचा प्रवेश हा त्या वर्गाचा कॉंग्रेसकडे कल दर्शवतो का, यावर सध्या चर्चा रंगत आहे. यावेळी, उत्कर्षा रुपवते यांनी सभेत कोणतेही विधान केलेले नसले तरी त्यांच्या या कृतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. आगामी काळात ही युती अधिकृत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.