Uttam Jankar : नगर : लोकसभा निवडणुकीत बारामतीचे राजकारण नेहमीच चर्चेत असते. पण, सध्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी लढत होणार आहे. त्यातही विशेष म्हणजे पवार कुटुंबातीलच शरद पवारांची (Sharad Pawar) मुलगी सुप्रिया सुळे व अजित पवारांची (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झालेली निवडणूक जिंकण्यासाठी अनेक मातब्बर नेत्यांना प्रचारासाठी उतरवले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी शरद पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा: तुझा अरविंद केजरीवाल करू; भाजप नेत्यांकडून कारवाईच्या धमक्या, राेहित पवारांचा आराेप
स्वतःच्या पक्षाच्या नेत्याविरुद्धच वक्तव्य (Uttam Jankar)
आता उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत बोलताना आपल्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी पक्षाचा संस्थापक सदस्य असून मीच अजित पवार यांना पक्षातून काढून टाकू शकतो”, असे विधान उत्तम जानकर यांनी केले आहे.
हे देखील वाचा: सुजय विखे २९ काेटींचे धनी
मी पक्षाचा संस्थापक सदस्य (Uttam Jankar)
“मला अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही. मी देखील दररोज विचारत आहे की, मला पक्षामधून काढले का? कारण पक्षाचा संस्थापक सदस्य मी पण आहे. मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो. कारण मी पक्षाचा सदस्य आहे. शरद पवारांना अजितदादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकरला अजित पवारांना काढायला अडचण काय? काढू शकतो”, असं उत्तम जानकर म्हणाले.
काही दिवसांपूर्वी उत्तम जानकर यांनी भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी चार्टर विमानाने बोलावून नागपूरला देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, विमानवारी करूनही भाजपाच्या पाठिंब्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. त्यानंतर काहीच दिवसांत उत्तम जानकर यांनी तुतारी फुंकली. तसेच शरद पवारांबरोबर जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे स्पष्टीकरण जानकरांनी दिले होते. यानंतर उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर अनेकदा निशाणा साधला.