Uttam Jankar:’पळून गेलेला बिबट्या परत येतोय त्याला घेऊ नका’- उत्तम जानकर

अजित पवार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरूनच उत्तम जानकर यांनी अजित पवारांना आणखी डिवचलं आहे.

0
Uttam Jankar:'पळून गेलेला बिबट्या परत येतोय त्याला घेऊ नका'- उत्तम जानकर
Uttam Jankar:'पळून गेलेला बिबट्या परत येतोय त्याला घेऊ नका'- उत्तम जानकर

Uttam Jankar : राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझविणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत आहे. त्याला घेऊ नका,असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकरांनी (Uttam Jankar) थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलच्या कार्यक्रमात बोलताना जानकर यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रवेशाला विरोध करताना जोरदार टोलेबाजी केली.

नक्की वाचा : नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा;वेेद्यकीय जामीन मंजूर

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर, शरद पवार गटाने आठ जागांवर बाजी मारत विजयी गुलाल उधळला. लोकसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांची शरद पवार गटात अनेकांची इनकमिंग सुरू आहे. काही नेते घरवापसी करत आहेत. त्यातच अजित पवार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरूनच उत्तम जानकर यांनी अजित पवारांना आणखी डिवचलं आहे.

‘अजित पवार यांना पक्षात घेतलं तर पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल’ (Uttam Jankar) 

काही दिवसांपूर्वी भाजपच्या विळखा देशालाच नव्हे तर राज्याला पडला होता. कोणीही बाहेर पडायला तयार नव्हतं. त्यातच जंगलाला आग लागल्यावर आपला बिबट्याही ४० जणांना घेऊन पळून गेला. मात्र यावेळी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चिमणी बनून आपल्या चोचित पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मतदारांनी मतांचा पाऊस पाडल्याने ही आग विझली. आता हाच बिबट्या पुन्हा शिकारीला बाहेर पडायच्या तयारीत आहे. इकडे येऊन तो याच चिमण्यांची शिकार करणार असल्यानं त्याला येऊ देऊ नका, अशी टीका उत्तम जानकर यांनी केली आहे. अजित पवार यांना पक्षात घेतलं तर, प्रामाणिकपणे पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल,असा इशाराही उत्तम जानकर यांनी दिला आहे.

अवश्य वाचा : ‘कलर्स मराठी’वर येणार नवीन मालिका; पहिली झलक आली समोर

‘ओबीसी आरक्षण प्रश्नाचे औषध फक्त शरद पवार यांच्याकडेच(Uttam Jankar) 


आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील,असा दावा करताना भाजप पुढच्या सत्ताधाऱ्यांना राज्यच चालवता येऊ नये, अशी अवस्था बनवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेसारख्या खर्चिक योजना आणल्या जात असून ही लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना असल्याचा टोलाही यावेळी जानकर यांनी लगावला आहे. तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नाचे औषध फक्त शरद पवार यांच्याकडेच आहे, असाही दावा जानकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here