Uttarakhand Avalanche:उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात ५७ मजूर अडकले;१६ जणांना वाचवण्यात यश

0
Uttarakhand Avalanche:उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात ५७ मजूर अडकले;१६ जणांना वाचवण्यात यश
Uttarakhand Avalanche:उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात ५७ मजूर अडकले;१६ जणांना वाचवण्यात यश

नगर : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक मोठी दुर्घटना घडली आहे.उत्तराखंडमधील चमोलीजवळच्या माणा गावाजवळ (Mana Village) हिमस्खलन (Avalanche) होऊन ५७ मजूर अडकले आहेत. त्यापैकी १६ मजूरांना बाहेर काढण्यात आलं आहे.चमोली ब्रदीनाथ हायवेवर अनेक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक ग्लेशियरचा मोठा तुकडा कोसळला. त्यामुळे हिमस्खलन होऊन अनेक मजूर खाली दबले गेले. यावेळी जवळपास ५७ मजूर(57 laborers) होते. त्यापैकी १६ जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलं असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

नक्की वाचा : पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी 

नेमकं काय घडलं ?(Uttarakhand Avalanche)

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंड परिसरात बर्फवृष्टी होत आहे.आजही मोठ्या प्रमाणात बर्फाचा कडा कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे. मदत आणि बचावकार्य घटनास्थळी दाखल झालं असून,अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बद्रीनाथ माणा इथं रस्त्याचं काम सुरु होतं. या कामासाठी असलेले मजूर जिथे राहतात त्याच्या जवळ हिमनग कोसळला. त्यामुळे त्या परिसरात असलेले मजूर बर्फाखाली दबले गेले. आतापर्यंत किती मजूर अडकले आणि किती जणांना बाहेर काढलं याचा अधिकृत आकडा प्रशासनाने दिलेला नाही, पण उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, ५७ मजूर इथे काम करत होते, त्यापैकी १६ जणांना बाहेर काढण्यात आलं.  

अवश्य वाचा : मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन–गोष्ट गनिमी काव्याची’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित 

बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर झाला अपघात (Uttarakhand Avalanche)

हे सर्व कामगार बीआरओशी करार केलेल्या कंत्राटदाराचे असल्याचे सांगण्यात येत आहे. चमोलीच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ हा अपघात झाला.या अपघातानंतर बचाव कार्यात तीन ते चार रुग्णवाहिका देखील सहभागी झाल्या आहेत. बचाव पथके हिमस्खलनाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहचण्यात अडथळे येत आहेत.
 
चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, घटनास्थळी सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे आम्ही हेलिकॉप्टर पाठवू शकत नाही. हालचाल अवघड आहे. सॅटेलाइट फोन उपलब्ध नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलूही शकत नाही. कोणतीही जीवितहानी झाल्याचे अधिकृत वृत्त नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here