Uut Marath Movie:श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चित्रपटाचा गौरव

0
Uut Marath Movie:श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चित्रपटाचा गौरव
Uut Marath Movie:श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चित्रपटाचा गौरव

नगर : ‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट (Uut Marath Movie) विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतोय. कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ (Sri Lanka International Film Festival 2025) मध्येही या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार (Best Feature Film Award) ‘ऊत’ या चित्रपटाने पटकावला आहे. ‘ऊत’ ला मिळत असलेला प्रतिसाद व विविध पुरस्कारांची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच असल्याचे चित्रपटातील मुख्य अभिनेता आणि निर्माते राज मिसाळ आवर्जून नमूद करतात.

नक्की वाचा : मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? अर्जाची प्रक्रिया कशी असेल?

चित्रपटाची कथा काय ?(Uut Marath Movie)

व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार आहे. या सोबतच ‘ऊत’ मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या वर्षाअखेर ‘ऊत’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अवश्य वाचा : पीयूसी नसल्यास पेट्रोल–डिझेल मिळणार नाही; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश  

ऊतचा देश- विदेशातील फेस्टिव्हलमध्ये डंका  (Uut Marath Movie)

मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल,श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे.चित्रपट प्रदर्शनापूर्वीच  विविध महोत्सवांमध्ये दखल घेतलेला ‘ऊत’ मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच वेगळा प्रयत्न ठरेल यात शंका नाही.