Vad Paachi Song:आदर्श शिंदे म्हणतोय ‘वढ पाचची’;आरडी चित्रपटातलं नवीन गाणं प्रदर्शित 

0
Vad Paachi Song:आदर्श शिंदे म्हणतोय 'वढ पाचची';आरडी चित्रपटातलं नवीन गाणं प्रदर्शित 
Vad Paachi Song:आदर्श शिंदे म्हणतोय 'वढ पाचची';आरडी चित्रपटातलं नवीन गाणं प्रदर्शित 

नगर : मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन विषयावर चित्रपट येत असतात. अशाच एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावर आधारित असलेल्या ‘आरडी’ चित्रपटाच्या(RD Movie) टीजरची चित्रपट सृष्टीत चांगलीच चर्चा आहे. आता या चित्रपटातलं “वढ पाचची”(Vad Paachi Song) हे धमाल गाणं प्रदर्शित (Launch) करण्यात आलं आहे.

नक्की वाचा : संतोष देशमुखांच्या हत्येचे ‘क्रूर’ फोटो समोर येताच महाराष्ट्र सुन्न   

 गणेश शिंदे यांनी केलं आरडी चित्रपटाचे दिग्दर्शन (Vad Paachi Song)

‘वढ पाचची’ या गाण्याला ‘पार्टी साँग’ म्हणता येईल. गीतकार मंदार चोळकर लिखित शब्दरचना, वरूण लिखाते यांचे ताल धरायला लावणारं संगीत आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणं प्रत्येकाला नाचायला लावणारं आहे. आजवर अनेक चित्रपटांतून पार्टी साँग आली असली, तरी ‘आरडी’ चित्रपटातलं “वढ पाचची” हे गाणं आणखी वेगळं आणि मनोरंजक आहे. ‘आरडी’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

अवश्य वाचा : मोठी बातमी!प्रतिज्ञापत्रासाठी लागणारी ५०० रुपयांची स्टॅम ड्युटी माफ  

२१ मार्चला चित्रपट होणार प्रदर्शित  (Vad Paachi Song)


साद एन्टरटेन्मेन्ट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे.आदित्य नाईक,साहिल वढवेकर,हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख  हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. बी.आप्पासाहेब यांनी या चित्रपटाचे सहलेखन आणि सहदिग्दर्शन केले आहे. हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here