Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्यांच्या बाळाची जबाबदारी कुणाकडे असणार ?

0
Vaishnavi Hagawane:वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्यांच्या बाळाची जबाबदारी कुणाकडे असणार ?
Vaishnavi Hagawane:वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्यांच्या बाळाची जबाबदारी कुणाकडे असणार ?

नगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरण हे राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Sucide) केलेल्या वैष्णवी हगवणेला अवघ्या ९ महिन्यांचा मुलगा (9-month-old boy) आहे. त्याच्या आईच्या मागे त्याचा सांभाळ कोण करील हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. यावर आता बाल कल्याण समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या ९ महिन्याच्या मुलाचा सांभाळ आता त्याची आजी म्हणजेच वैष्णवी हगवणेची आई करणार आहे. यासंदर्भात महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे माहिती दिली आहे. 

नक्की वाचा : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा आदिवासी विभागाचा निधी वळवला

अदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय ? (Vaishnavi Hagawane)

आदिती तटकरे पोस्टमध्ये म्हणाल्या की, ‘पुण्यातील स्व.वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा ९ महिन्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.यापुढे स्व.वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा कायदेशीर ताबा श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची,आरोग्याची व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती स्वाती कस्पटे यांची असेल”,असंही त्यांनी पुढे सांगितलं.

अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी  

निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक (Vaishnavi Hagawane)

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या नीलेश चव्हाणला नेपाळ सीमेवर अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. त्याने पुण्याहून रायगड, दिल्ली, गोरखपूर आणि तेथून नेपाळ गाठल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.