नगर : पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्या (Sucide) प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरलं आहे. आता या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास बावधन पोलिसांनी (Bavdhan Police) हगवणे पिता पुत्राला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.
नक्की वाचा : अखेर मृत वैष्णवी हगवणेचं बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे सुपूर्द
वैष्णवीच्या मृत्यूनंतर जवळपास आठवडाभरापासून हे दोघं पसार झाले होते. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणेची काल (ता.२२) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती. काल रात्री राजेंद्र यांचा भाऊ संजय हगवणेला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या चौकशीत दोघांचा ठावठिकाणा पोलिसांना समजला.
अवश्य वाचा : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख ठरली;’या’ दिवशी होणार प्रदर्शित
कशी केली अटक ? (Vaishnavi Hagawane Death)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात पोलिसांना अडथळे येत होते. अखेर आज या दोघांनाही पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. महत्वाचे म्हणजे आरोपींनी अटकेपूर्वी एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत मटण पार्टी केली, याचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यानंतर गुरुवारी (ता.२२) मावळ तालुक्यातील तळेगाव येथे एका हॉटेलमध्ये ते आले होते. त्याचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले. जेवणानंतर ते तिथून निघून गेले. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी नाकाबंदी सुरू केली आणि संपूर्ण परिसराची झडती घेतली. अखेर पहाटे त्यांना पोलिसांनी अटक केली.
काय कारवाई होणार ? (Vaishnavi Hagawane Death)
बावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशिल हगवणे यांना अटक केल्यानंतर या दोघांना आज दुपारी दोन वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांना किती दिवसाचं रिमांड बावधन पोलिसांकडून मागितले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. राजेंद्र आणि सुशिलला कुणी कुणी मदत केली ? ते कोणत्या ठिकाणी लपून बसले होते? त्याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. त्यामुळे पोलिस जास्त दिवसांची रिमांड मागू शकतात,अशी शक्यता वर्तविली जात आहे.