Vaishnavi Hagawane Death:अखेर मृत वैष्णवी हगवणेचं बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे सुपूर्द 

0
Vaishnavi Hagawane Death:अखेर मृत वैष्णवी हगवणेचं बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे सुपूर्द 
Vaishnavi Hagawane Death:अखेर मृत वैष्णवी हगवणेचं बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे सुपूर्द 

नगर : पुण्यातील अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. वैष्णवीने आत्महत्या केल्यावर तिच्या ९ महिन्यांच्या बाळावरून वाद पेटला होता.अखेर हे बाळ आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाणेर हायवेजवळ अज्ञाताने बाळ सोपवल्याची (Baby) माहिती वैष्णवीच्या कुटुंबीयांनी दिली.

नक्की वाचा : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी!गणपतीला कोकणात समुद्रमार्गे जाता येणार
वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते, बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना भेटत नव्हता. मात्र वैष्णवीचं बाळ तिचा नवरा शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केला होता,असं असताना बाळ ताब्यात देण्यास नकार दिला जात होता. अखेर त्या बाळाचा ताबा आता कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे.

अवश्य वाचा : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख ठरली;’या’ दिवशी होणार प्रदर्शित 

नेमकं काय घडलं ? (Vaishnavi Hagawane Death)

वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच वैष्णवीचं बाळ हे ना हगवणे कुटुंबियांकडे होतं,ना कस्पटे कुटुंबियांकडे होतं. ते वैष्णवीच्या नवऱ्याच्या मित्र असलेल्या निलेश चव्हाण यांच्या घरी होतं. त्यानंतर वैष्णवीचे काका बाळाला घेण्यासाठी निलेश चव्हाण यांचं घर गाठलं. परंतु यावेळी दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर काहीवेळेतच कस्पटे कुटुंबियांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि बाणेरच्या हायवेजवळ येऊन तुमचे बाळ घेऊन जा,असे त्यांनी सांगितले. त्यानंतर वैष्णवीचे काका बाणेरच्या हायवेजवळ गेले आणि त्यांना ९ महिन्यांचे बाळ सुपुर्द केले.आता ही अज्ञात व्यक्ती कोण होती ? याची माहिती घेतली जात आहे.  

प्रकरण नेमकं काय ? (Vaishnavi Hagawane Death)

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान वैष्णवी हगवणे हिने तिला नेमका काय जाच झाला हे स्वतःचं एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आई-वडिलांना विरोध करुन शशांक सोबत प्रेम विवाह केला, ही माझी आयुष्यातील मोठी चूक होती. आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरचं मी घटस्फोट घेणार आहे, असं वैष्णवीने मैत्रिणीकडे सांगितलं होतं, पण तत्पूर्वीच वैष्णवीवर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली, या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.