Vaishnavi Hagawane Death:वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी माहिती आली समोर;मारहाणीचे २९ पैकी ६ व्रण ताजे

0
Vaishnavi Hagawane Death:वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी माहिती आली समोर;मारहाणीचे २९ पैकी ६ व्रण ताजे
Vaishnavi Hagawane Death:वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी माहिती आली समोर;मारहाणीचे २९ पैकी ६ व्रण ताजे

नगर : सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने राहत्या घरात गळफास (Sucide case) घेऊन आत्महत्या केली आहे. आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून (Postmortem report) समोर आली आहे.

नक्की वाचा :  ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत’-संजय राऊत 

हगवणे प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!  

मारहाणीचे २९ पैकी ६ व्रण ताजे (Vaishnavi Hagawane Death)

वैष्णवी हगवणेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आला आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला हगवणे कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण २९ व्रण आहेत, त्यातील ५ ते ६ व्रण ताजे असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.  

हगवणेंची बँक खाती गोठवली (Vaishnavi Hagawane Death)

आता हगवणे कुटुंबीयांचे सर्व बँक खाते पोलिसांनी गोठवले आहेत. वैष्णवीचे सोने का तारण ठेवले आणि त्यातून येणाऱ्या रकमेचे हगवणे कुटुंबीयांनी काय केलं ? याचा तपास अजून  बाकी आहे. तसेच फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांचा संबंध काय ? पोलिसांना हगवणे कुटुंबीयांची एकत्र चौकशी करायची आहे, त्यामुळे हगवणे कुटुंबियांची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी,अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे.