Vaishnavi Hagawane Death: वैष्णवी हगवणेच्या लग्नात पाण्यासारखा खर्च;पहा नेमका खर्च किती?

0
Vaishnavi Hagawane Death:वैष्णवी हगवणेच्या लग्नात पाण्यासारखा खर्च;पहा नेमका खर्च किती?
Vaishnavi Hagawane Death:वैष्णवी हगवणेच्या लग्नात पाण्यासारखा खर्च;पहा नेमका खर्च किती?

नगर : पुण्यातील वैष्णवी हागवणेच्या आत्महत्येनंतर (Vaishnavi Hagawane Death) बडेजाव मिरवण्यासाठी लग्नात करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची (Expenditures worth crores of rupees) चर्चा होत आहे. वैष्णवी आणि शशांक यांचा २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीच्या माहेरच्यांनी ५१ तोळे सोने, एक आलिशान चारचाकी गाडी, चांदीची भांडी भेट म्हणून दिली आणि सुसगाव येथील सनीज वर्ल्डमध्ये लाखो रूपये खर्च करून शाही थाटामाटात विवाह आयोजित केला होता.

नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप  
लग्नाच्या काही दिवसांनंतर वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. लग्नात चांदीची भांडी न दिल्याने नाराज झालेल्या तिच्या सासरच्या लोकांनी तिचा अपमान केला. तक्रारीत असेही म्हटले आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.

वैष्णवी आणि शशांकच्या लग्नात कोट्यवधींचा करण्यात आलेला खर्च हा हुंड्याचा नवा प्रकार मानला जात आहे. त्याचे दुष्परिणाम समाजावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबीयांनी ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार असा हुंडा तर घेतला होताच. त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्ब्ल दीड कोटी रुपये खर्च ही करायला लावला. पाण्यासारखा खर्च करून कस्पटेंनी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. तरीही त्यांना मुलगी गमवावी लागली.

अवश्य वाचा : प्रेमाच्या गोडसर लहरींनी भरलेलं;’सजना’ चित्रपटाचं रोमँटिक गीत ‘झोका’ प्रदर्शित

वैष्णवीच्या लग्नासाठी झाला होता ‘इतका’ खर्च (Vaishnavi Hagawane Death)

१. वैष्णवीच्या लग्नासाठी तब्ब्ल दहा लाख रुपये भाडे असलेले आलिशान रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावले.
२. लग्नसमारंभातील स्टेजच्या सजावटीवर बावीस लाख रुपये खर्च करायला लावले.
३. पाच हजार जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. एक व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार याप्रमाणे ५० लाख जेवणावर खर्च करायला लावले.
४. पाहुण्यांचे सत्कार, स्वागत आणि कपड्यांवर खर्च करायला लावला.
५. लग्नाचे कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावले,त्याचे लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावले.

                             अशाप्रकारे वैष्णवीच्या लग्नात एका दिवसासाठी तब्ब्ल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

वैष्णवीला पाहायला आलेल्या मुलांना शशांकने दिला त्रास (Vaishnavi Hagawane Death)

समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवी आणि शशांकने प्रेमविवाह करायचं ठरवलं. तेव्हा वैष्णवीच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबीयांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना हगवणे कुटुंबीयांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी वैष्णवीला समजावून तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, शशांकने त्या प्रयत्नांमध्ये खोडा घालणं सुरु केलं. वैष्णवीला पाहायला आलेल्या दोन मुलांना शशांकने फोन केला आणि त्यांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे.