नगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Death Case) मोठी माहिती समोर आली आहे. वैष्णवीचा पती शशांक हगवणे (Shashank Hagawane) आणि सासु लता हगवणे (Lata Hagawane) या आई-लेकाला पोलीस अटक करणार (The police will make an arrest) असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांनी पावलं टाकत या दोघांचा ताबा मिळावा यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता.आज (ता २) सोमवारी यावर सुनावणी पार पडली असता न्यायालयाने तशी परवानगी दिली आहे. त्यामुळे येरवडा तुरुंगातून पोलीस आई-लेकाचा ताबा घेणार असल्याचे ही बोलले जात आहे.
नक्की वाचा : ‘दत्तक घेतलेल्या नाशिकचं अनाथाश्रम करून टाकलं’;संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
प्रकरण नेमकं काय ? (Vaishnavi Hagawane)
हगवणे आई-लेकाने जेसीबी विक्री करताना फसवणूक केली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील निगोजे गावचे प्रशांत येळवंडे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मार्च २०२२ पासून ऍडव्हान्स आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी प्रशांत यांनी ११ लाख ७० हजार रुपये लता हगवणेंच्या खात्यावर टाकलेत. मात्र काही महिन्यांतच बँकेने प्रशांत यांच्याकडून जेसीबी ताब्यात घेतला. त्यामुळे हे प्रकरण म्हाळुंगे पोलिसात गेलं होतं. मात्र तिथं ही पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी या प्रकरणात ही हस्तक्षेप केला, त्यामुळं तेव्हा अपेक्षित कारवाई झाली नाही,असा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केला आहे. वैष्णवीच्या प्रकरणानंतर जागे झालेल्या पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आणि जेसीबी ताब्यात घेतला आहे.न्यायालयाने अटकेची परवानगी दिल्यानं उद्या म्हणजेच मंगळवारी म्हाळुंगे पोलीस येरवडा तुरुंगातून हगवणे आई-लेकाला बेड्या ठोकणार आहेत.
अवश्य वाचा : वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्यांच्या बाळाची जबाबदारी कुणाकडे असणार ?
प्रशांत येळवंडेंचा नेमका आरोप काय ?(Vaishnavi Hagawane)
जेसीबी व्यवहारात फसवणूक झालेल्या प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी हस्तक्षेप केला होता. त्यामुळं मे २०२४ च्या तक्रारीवेळी अपेक्षित कारवाई झाली नाही, असा आरोप तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी केला. शशांक आणि लता हगवणेंनी प्रशांतची ११ लाख ७० हजारांची फसवणूक केली आणि बंदुकीचा धाक दाखवून कुटुंब संपवण्याची धमकी दिली. या विरोधात प्रशांतने मे २०२४ मध्ये गुन्हा दाखल केला होता.मात्र माझा मामा मोठा अधिकारी आहे, त्यामुळं माझ्यावर कारवाई करण्याची कोणाची हिंमत नाही,असा दम शशांकने दिल्याचं प्रशांतने सांगितले आहे.