Walmik Karad:संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
Walmik Karad:संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Walmik Karad:संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयाने आज (ता.२२) कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी ही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नक्की वाचा :  जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज

वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Walmik Karad)

संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने आज न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कराडला बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते.त्याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. आता याप्रकरणात वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का, हे पाहावे लागेल. मात्र, मकोका लागल्याने तुर्तास जामीन मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.

अवश्य वाचा : अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’मधील लूक आला समोर;दिसणार छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत  

वाल्मिक कराडला जामीन मिळणार का ?(Walmik Karad)


दरम्यान, वाल्मिक कराड याने ३१ डिसेंबरला पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्करली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या समर्थकांनी मध्यंतरीच्या काळात सुटकेसाठी परळी आणि आष्टी परिसरात निदर्शने केली होती. यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही वाल्मिकला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. एरवी न्यायालयीन कोठडीतील आरोपीला जामीन मिळणे सोपे असते. मात्र, वाल्मिक कराडला मकोका लागल्याने जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here