Vanchit Bahujan Aaghadi : नगर : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल (ता. १६) राज्यातील विधानसभांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात राज्यातील ३० विधानसभा मतदार संघातील (Assembly constituency) उमेदवारांचा समावेश आहे.
नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम
उमेदवारांची पहिली यादी जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी (ता. १५) महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील आचारसंहिता जाहीर केली. मंगळवार (ता. २२)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. त्यादृष्टीने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत. यात वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा करत आपले उमेदवार ठरवण्यासाठी मुलाखती घेतल्या आहेत. त्यानुसार काल (ता. १६) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे
जिल्ह्यातील दोन जागांचे उमेदवार जाहीर (Vanchit Bahujan Aaghadi)
या उमेदवारांच्या यादीत राज्यातील ३० विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे. यात नगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघातून अझीज अब्दुल व्होरा तर राहुरी मतदारसंघातून अनिल भिकाजी जाधव हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
राज्यभरात हे असणार उमेदवार
- *धुळे शहरातून जितेंद्र शिरसाट
*सिंदखेडमधून भोजासिंग तोडरसिंग रावल
*उमरेडमधून सपना राजेंद्र मेश्राम
*बल्लारपूरमधून सतीश मुरलीधर मालेकर
*चिमूरमधून अरविंद आत्माराम सांदेकर
*किनवटमधून प्रा. विजय खुपसे
*नांदेड उत्तरमधून प्रा. डॉ. गौतम दुथडे
*देगलूरमधून सुशील कुमार देगलूरकर
*पाथरीतून विठ्ठल तळेकर
*परतूर-आष्टीमधून रामप्रसाद थोरात
*घनसावंगीमधून कावेरी बळीराम खटके
*जालन्यातून डेव्हिड घुमारे
*बदनापूरमधून सतीश खरात
*देवळालीमधून अविनाश शिंदे
*इगतपुरीतून भाऊराव काशिनाथ डगळे
*उल्हासनगरमधून डॉ. संजय गुप्ता
*अणुशक्तीनगरमधून सतीश राजगुरू
*वरळीमधून अमोल आनंद निकाळजे
*पेणमधून देवेंद्र कोळी
*आंबेगावमधून दीपक पंचमूख
*संगमनेरमधून अझीज व्होरा
*राहुरीतून अनिल जाधव
*माजलगावमधून मंजूर चांद शेख
*लातूर शहरातून विनोद खटके
*तूळजापूरमधून डॉ. स्नेहा सोनकाटे
*उस्मानाबादमधून ॲड. प्रणित शामराव डिकले
*परंडमधून प्रवीण रणबागूल
*अक्कलकोटमधून संतोषकुमार खंडू इंगळे
*माळशिरसमधून राज यशवंत कुमार
*मिरजमधून विज्ञान प्रकाश माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.