Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर!; नागपूर-पुणे वंदे एक्सप्रेसला रेल्वेमंत्रालयाचा हिरवा झेंडा

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर!; नागपूर-पुणे वंदे एक्सप्रेसला रेल्वेमंत्रालयाचा हिरवा झेंडा

0

Vande Bharat Express : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि विशेषतः अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील (Ahilyanagar Lok Sabha Constituency) प्रवाशांच्या सोयीसाठी आता नागपूर ते पुणे हे वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) रेल्वे सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) हिरवा झेंडा दाखविला आहे. या गाडीला अहिल्यानगर शहरासह कोपरगाव येथे अधिकृत थांबा देण्यात आला असून जिल्ह्यातील प्रवाशांना आता जलद, आरामदायक आणि उच्च दर्जाच्या प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

अवश्य वाचा : आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

सोमवार वगळता आठवडयातून ६ दिवस पुण्याकडे प्रस्थान

पुणे येथे २३ जुलै रोजी पार पडलेल्या रेल्वे सल्लागार मंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. १० ऑगस्ट रोजी नागपूरहून या रेल्वेसेवेला सुरूवात होणार असून अजनी, नागपूर येथून सोमवार वगळता आठवडयातून ६ दिवस ही गाडी पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. तर पुण्याहून मंगळवार वगळता आठवडयातून ६ दिवस ही गाडी अजनी, नागपूरकडे प्रस्थान करणार आहे.

नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न

अहिल्यानगर स्थानकावर सायंकाळी ७ : ३५ ला आगमन (Vande Bharat Express)

अजनी, नागपूरहून पुण्याकडे जाताना या गाडीचे अहिल्यानगर स्थानकावर सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी आगमन होईल व ७ वाजून ३७ मिनिटांनी पुण्याकडे प्रस्थान होईल. पुण्यहून अजनीकडे प्रस्थान करताना अहिल्यानगर स्थानकावर ही गाडी सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी पोहचेल व ८ वाजून ३५ मिनिटांनी अजनी, नागपूरकडे प्रस्थान करेल. अजनी, नागपूर स्थानकावरून ही एक्सप्रेस सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुटेल तर पुण्याहून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी नागपूरसाठी सुटणार आहे.