Vande Mataram : “वंदे मातरम” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त संगमनेरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन

Vande Mataram : “वंदे मातरम” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त संगमनेरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन

0

Vande Mataram : संगमनेर: भारतीय स्वातंत्र्य संग्रामात (Indian Freedom Movement) देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे आणि राष्ट्रभावनेला नवी दिशा देणारे “वंदे मातरम” (Vande Mataram) या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संगमनेर येथे उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (Bankim Chandra Chattopadhyay) यांनी इ.स. 1875 मध्ये रचलेल्या “वंदे मातरम” या गीताच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल, संगमनेर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे

अनेक मान्यवर उपस्थित

या कार्यक्रमाचे आयोजन शाहीर विठ्ठल उमप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले होते. सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत पार पडलेल्या कार्यक्रमात गीतगायन, देशभक्तीपर भाषणे, वकृत्व स्पर्धा, निबंधलेखन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार धीरज मांजरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी अरुण उंडे आणि प्रमुख वक्ते म्हणून ॲड. ईशान गणपुले उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य एस. जी. कूमावत यांनी केली, तर समारोपाचे उदगार गटनिदेशक पी. के. बडगुजर यांनी केले. याप्रसंगी योगेश कासट, अविनाश पुलाटे, सुमेध संत, कमलाकर भालेकर, राजेंद्र देशपांडे, गिरीश डागा, अक्षय थोरात, हरिदास कमठ, उद्योगपती संदीपजी फटांगरे, प्रशासन अधिकारी जालिंदर खताळ, क्रीडापटू प्रणिती सोमण, पत्रकार संजय अहिरे, भारत रेघाटे, विशाल वाकचौरे, गाडेकर, कल्याण राऊत, विनायक भोसले, सौरभ म्हाळस यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Vande Mataram : “वंदे मातरम” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त संगमनेरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन
Vande Mataram : “वंदे मातरम” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त संगमनेरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात

“वंदे मातरम”वर आधारित देशभक्तिपर नाटिका सादर (Vande Mataram)

कार्यक्रमात 26 अधिकारी, 164 कर्मचारी, तसेच 21 शाळा आणि 4 महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले. एकूण 4112 शालेय विद्यार्थी, 787 महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शासकीय व अशासकीय आयटीआयमधील 1001 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी “वंदे मातरम” गीतावर आधारित देशभक्तिपर नाटिका सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या नाटिकेच्या यशस्वी सादरीकरणासाठी एस.डी. जगताप, पी.के. महतोले, ए.एस. यादव, पी.एस. कांबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ए.एस. देशपांडे, एम.बी. हिरे, एस.एम. कोल्हे, के.बी. गोडे, एम.एच. काळे, सी.एम. वीर, एन.आर. कडलग, बी.के. शिंगाडे, एन.एस. गोसावी, तसेच एस.एस. सोनवणे, डी.एन. शिरसाट, एन.एन. गोटे, के.जी. गोसावी,  ओ.आर. नरवाला, ओ.डी. पांडे या सर्व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. “वंदे मातरम” या राष्ट्रभावनेला साजेशा या कार्यक्रमाने संगमनेरमध्ये देशभक्तीची लहर निर्माण केली.