Vanrai Bandhara : अकोले : तालुक्याच्या आढळा खोऱ्यातील समशेरपूर, सावरगाव पाट, पाडोशी, पिंपळदरावाडी, एकदरे, जायनावाडी येथे महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) कृषी विभागाच्या (Agriculture Department) मदतीने तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी व मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधारे (Vanrai Bandhara) बांधण्यात आले.
नक्की वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सही; पुण्यातील रुग्णाला मिळाली मदत
कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणीसाठा
जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यामधून पाण्याचा प्रवाह चालू असतो. हा पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून सिमेंट व खताच्या रिकाम्या गोण्या, माती व वाळू यांच्या साह्याने पाणलोटक्षेत्र व पाणलोटक्षेत्राच्या बाहेरही वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. वनराई बंधारा बांधण्यासाठी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणीसाठा होईल, अशी जागा निवडली जाते. प्रामुख्याने त्या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग जनावरांना पाणी पिण्यासाठी महिलांना कपडे, भांडे धुण्यासाठी तसेच बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरातील विहिरीतील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी होणार आहे. वनराई बंधारा पाणीसाठ्यामधून पाणी उपसा करून रब्बी पिके गहू, हरभरा व भाजीपाला पिकांना देता येणार आहे. सदर बंधारा बांधण्यासाठी समशेरपूर परिसरातील कृषी सेवा केंद्रधारक यांनी सिमेंट व खताच्या रिकाम्या गोण्यांचा पुरवठा केला.
अवश्य वाचा : टंचाईग्रस्त नागलवाडीत पाणीच पाणी; जलयुक्त शिवारने केली किमया
मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर म्हणाले, (Vanrai Bandhara)
दरवर्षी प्रत्येक गावात वनराई बंधारे लोकसहभागातून बांधले जातात त्या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पाळीव जनावरे, रब्बी पिकांना होतो. वनराई बंधाऱ्यांमुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी पातळीत वाढ होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी म्हणाले, समशेपूर गावात कृषी विभाग अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून बांधण्यात आलेला बंधारा महिलांना धुणीभांडी व जनावरांना पाणी पिण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी ग्रामस्थ, कृषी पर्यवेक्षक संदीप जोर्वेकर, साहेबराव वायाळ, कृषी सहाय्यक राघू पेढेकर, अरुण बांबेरे, नथू शेंडे, अनिल बांबेरे, रवींद्र मांडवे, चंद्रकांत गिऱ्हे, रूपाली भांगरे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी आदी उपस्थित होते.