Varsha Pandit : नगर : मुरगांव हिंदु समाज च्या वतीने (Hindu Society) श्रीमहालक्ष्मी पूजनोत्सव समिती मुरगांव गोवा (Goa) वास्को यांनी आयोजित केलेल्या श्री महालक्ष्मी उत्सवानिमीत्त दीपावली पाडव्याच्या दिवशी “स्वरौत्सव” या कार्यक्रमात वर्षा पंडित (Varsha Pandit) यांनी गायलेल्या मराठी भक्तीगीत व भावगीतांची बहारदार मैफल गोव्यातील रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.
नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यात तरतूद नाही
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन
गायिका वर्षा चंद्रकांत पंडित यांच्या समवेत गोव्यातील अशोक मांद्रेकर, राज्ञी नितिन फळदेसाई व सिया उपाडेंकार, तनिष्का सातार्डेकार यांनी सह गायन केले. गाण्याच्या साथीसाठी सार्थ गोवेकर (तबला), विग्नेश सावंत (हार्मोनियम), सुरेश घाडी (सिंथेसायझर), महादेव गावडे (ऑक्टोपॅड), तेजस तोरसकर (पखवाज), प्रदीप नाईक (तालवाद्य) यांची उत्तम साथ संगत लाभली. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते माजी मंत्री मिलिंद सगुण नाईक यांच्या पुढाकारातून शैलेश गोवेकर यांनी कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट असे आयोजन केले होते.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
कार्यक्रम मान्यवर व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न ()
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमहालक्ष्मी उत्सव समितीचे सल्लागार उमेश साळगांवकार, समिती अध्यक्ष मनेष आरोलकार, शैलेंद्र गोवेकार, वासुदेव साळगांवकार, प्रशांत लोटलीकार, भरत कोलगांवकार, वामन चोडणकार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व देवी पूजन झाले. त्यानंतर गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला त्यात मराठी भावगीत भक्तिगीतानी हा सुंदर कार्यक्रम श्री महालक्ष्मी मंदिर मुरगांव खारीवाडा वास्को गोवा येथे चंद्रकांत पंडित, पद्माकर वांजळे इत्यादी अनेक मान्यवर व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.



