VBA : उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

VBA : उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

0
Utkarsha Rupwate

VBA : संगमनेर: शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे आणि महायुतीकडून सदाशिव लोखंडे या आजी-माजी खासदारांमध्ये थेट लढत होणार आहे. शिर्डीची उमेदवारी काँग्रेसला (Congress) मिळवण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश मिळाले आणि त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार उत्कर्ष रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांनी बंडखोरी केल्याच्या वावड्या उठल्या असतानाच, त्यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची सदिच्छा भेट घेतल्याची छायाचित्रे प्रसारमाध्यमावर झळकली आहेत. त्यामुळे दोन्ही प्रस्थापित उमेदवारांसाठी उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) या डोकेदुखी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे देखील वाचा: नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम

शिर्डी लोकसभा मतदार संघातून उत्सुक (VBA)

राज्याच्या महिला आयोगाच्या सदस्या आणि काँग्रेसच्या युवा नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी या वेळच्या लोकसभेसाठी अनेक दिवसांपासून कंबर कसली होती. शिर्डी लोकसभा  मतदार संघ पिंजून काढतांना, कार्यकर्त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची आशा दाखवली होती. त्यांच्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी यामुळे मिळणार होती.

नक्की वाचा: नीलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा; ‘तुतारी’वर लाेकसभा लढवणार, विखे विरुद्ध लंके जाेरदार सामना रंगणार

जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला (VBA)

मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मतदारसंघाची ही जागा खेचून आणण्यात अपयशी ठरले आणि ही जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला गेल्याने सदर उमेदवारी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्कर्षा रूपवते यांनी समाज माध्यमातील वॉलवरून काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आणि चिन्ह काढून टाकल्याने, त्यांना काँग्रेसच्या हातातील हात काढून घेतल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या. आणि त्यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने आता शिर्डी मतदारसंघात उत्कर्षा रुपवते या वंचित आघाडीकडून निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याचे  स्पष्ट होऊ लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here