VBA : संगमनेर: काँग्रेसचे (Congress) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी परदेशात जात आरक्षण विरोधी व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या यशोधन संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चासाठी जात असताना पोलिसांनी हा मोर्चा शासकीय विश्रामगृहाजवळ अडवत सर्व मोर्चेकरांना स्थानबद्ध केले.
नक्की वाचा: अखेर आमदार अपात्रता प्रकरणाला मुहूर्त;’या’दिवशी होणार सुनावणी
राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्यामार्गदर्शनाखाली सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अन आरक्षणाला विरोध करणारे राहुल गांधी यांच्या विरोधात मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा मोर्चा बसस्थानक मार्गे नाशिक रोडने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयवरती जात असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी हा मोर्चा शासकीय विश्राम गृहाजवळ अडविला.
अवश्य वाचा: बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध (VBA)
यावेळी आंदोलनकर्ते अन् पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. आम्हाला हा मोर्चा यशोधन कार्यालयावर नेण्याचा आग्रह धरण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी हा मोर्चा पुन्हा सुरू केला. मात्र, पोलीस प्रशासनाने बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या शिवाजीनगरच्या कोपऱ्यावरती अडवित पुढे नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलनकर्ते अन् पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे मोर्चेकरी जास्तच आक्रमक झाले होते. त्यानंतर हा मोर्चा आटोक्यात येत नाही म्हणून सर्व मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.