Vehicle action : विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर त्रिसूत्री कारवाई

Vehicle action : नगर तालुका : विनाक्रमांक किंवा फॅन्सी क्रमांक लावून वाहन फिरणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांची 'ॲक्शन', 'रिॲक्शन' आणि 'सोल्यूशन', अशी त्रिसूत्री वाहन कारवाई (Vehicle action) सुरू केली आहे.

0
Vehicle action : विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर त्रिसूत्री कारवाई
Vehicle action : विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर त्रिसूत्री कारवाई

Vehicle action : नगर तालुका : विनाक्रमांक किंवा फॅन्सी क्रमांक लावून वाहन फिरणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांची ‘ॲक्शन’, ‘रिॲक्शन’ आणि ‘सोल्यूशन’, अशी त्रिसूत्री वाहन कारवाई (Vehicle action) सुरू केली आहे. कोतवाली पोलिसांनी (Police) अशी केलेली कारवाई राज्यात पहिल्यांदा झाली. उपक्रमशील पोलीस निरीक्षक (Inspector of Police) चंद्रशेखर यादव यांच्या या कारवाईची सध्या नगर जिल्ह्याबरोबर राज्य पोलीस दलात चर्चा सुरु झाली आहे.

हे देखील वाचा : नगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

नगर शहरात दुचाकीवरून येत लुटीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. गुन्हेगारांची शोध घेण्यासाठी वाहनांवरील क्रमांक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे गुन्हा घडला की पहिले वाहन आणि त्यानंतर त्याचा क्रमांक पोलिसांकडून तपासला जातो. मात्र, अलीकडच्या काळात नगर शहरात विनाक्रमांक दुचाकी, फॅन्सी नंबर प्लेटच्या दुचाकींची संख्या वाढली आहे. याशिवाय गुन्हेगारी देखील वाढली आहे. पोलिसांकडून उपाययोजना होतात. परंतु ठोस असे काही साध्य होत नाही. मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेटवर ‘ॲक्शन’, ‘रिॲक्शन’ आणि ‘सोल्यूशन’, अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे.

नक्की वाचा : ‘शांतीकुमारजी फिरोदिया’ फाउंडेशन बुद्धिबळाच्या प्रचार, प्रसारासाठी कटिबद्ध : नरेंद्र फिरोदिया

कारवाईतील ही त्रिसूत्री म्हणजे ती वाहने ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणायची. या कारवाईनंतर ‘रिअॅक्शन’ म्हणजेच, विनाक्रमांक किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनाची कागदपत्रे तपासत दंडात्मक कारवाई करायची. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दंडात्मक कारवाईनंतर या वाहनांवर कोतवाली पोलिसांनी सरकारच्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट बसवून दिली गेली. कोतवाली पोलिसांनी आज पहिल्या दिवशी अशा ४२ वाहनांवर कारवाई केली. तसेच वाहनचालकांकडून १९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here