नगर : उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे (Mahakumbh 2025)आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात मौनी अमावस्येनिमित्त गंगा घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या ३० भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू (Death in a stampede) झाला. बॅरिकेट्स हटल्याने भाविक एकमेकांवर पडले, परिणामी या चेंगराचेंगरीत ९० हून अधिक भाविक जखमीही झाले होते. ही परिस्थिती भविष्यात टाळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने काही मार्गदर्शक तत्वे (Guidelines) जारी केली आहेत. त्यानुसार, या भागात सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घालण्यात आली असून व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आला आहे.
नक्की वाचा : महसूलच्या पथकावर वाळू तस्करांचा हल्ला
योगी आदित्यनाथ यांची मार्गदर्शक तत्वे कोणती ? (Mahakumbh 2025)
महाकुंभ परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली.गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले असून कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना प्रवेश मिळणार नाही. प्रयागराज लगतच्या जिल्ह्यांमधून येणारी वाहने जिल्ह्याच्या सीमेवर थांबवली जात आहेत. शहरात चारचाकी वाहनांना ४ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशबंदी आहे. कुंभमेळा परिसरात वाहतूक सुरळीत राहावी आणि अनावश्यक थांबे टाळावेत,अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात.
जर रस्त्यावर विक्रेते त्यांचे व्यवसाय चालवत असतील,तर वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची खात्री करून त्यांना रिकाम्या भागात हलवावे,असे योगी आदित्यनाथ म्हणाले.येथे भेट देणाऱ्या लोकांना विनाकारण थांबवू नये. अयोध्या-प्रयागराज, कानपूर-प्रयागराज, फतेहपूर-प्रयागराज, लखनौ-प्रतापगढ-प्रयागराज आणि वाराणसी-प्रयागराज यांसारख्या मार्गांवर मेळा परिसरात गस्त वाढवण्यासाठी आणि वाहतूक ठप्प होणार नाही,याची काळजी घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
अवश्य वाचा : संविधान व सन्मानपत्र देऊन माजी सैनिकांचा महासन्मान; सी.डी. देशमुख लॉ कॉलेजचा अभिनव उपक्रम…
बॅरिकेटिंगचा प्रभावीपणे वापर करण्याचे निर्देश (Mahakumbh 2025)
प्रयागराजहून परतीचे सर्व मार्ग खुले आणि विनाअडथळा राहावेत.भाविकांना सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पुढे जाण्याची परवानगी द्यावी. ते मेळा परिसरात जेथे थांबतील, तेथे सर्व होल्डिंगच्या ठिकाणी अन्न व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी,असे आदेश यावेळी देण्यात आलेत. गर्दीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी आणि मेळा परिसरात योग्य पार्किंग व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी बॅरिकेटिंगचा प्रभावीपणे वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.