Vichar Bharati | विचार भारती व जनसेवा फाउंडेशनचे उपक्रम कायम स्वरूपी होणे आवश्यक : अॅड.विश्वासराव आठरे

0
Vichar Bharati  विचार भारती व जनसेवा फाउंडेशनचे उपक्रम कायम स्वरूपी होणे आवश्यक अॅड.विश्वासराव आठरे
Vichar Bharati  विचार भारती व जनसेवा फाउंडेशनचे उपक्रम कायम स्वरूपी होणे आवश्यक अॅड.विश्वासराव आठरे

Vichar Bharati | नगर : आपल्याला देशाचा इतिहास हा पुस्तकातून शिकवला जात होता. पण सध्याची पुस्तके पहाता हा जुना इतिहास पुस्तकांमधून पुसला गेला आहे. नव्या पिढीला आपल्या महापुरुषांची नावेही माहिती नाहीत हे दुर्दैव. आपली संस्कृती सोडून मुल परकीयांचे अनुकरण करत असल्याने त्यांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपला इतिहास, संस्कृती पुन्हा सर्वांपुढे आणण्यासाठी विचार भारती (Vichar Bharati)जनसेवा फाउंडेशनचे (Janseva Foundation) समाजोपयोगी उपक्रम कायम स्वरूपी होणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या घटना पहाता समाजात वैचारिक सुधारणा होणे खूप आवश्यक आहे. हे समाज सुधारण्याचे काम विचार भारती व जनसेवा फाउंडेशन करत असल्याने सर्व समाजांनी त्यांच्या उपक्रमांना साथ द्यावी, असे अवाहन जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव अॅड.विश्वासराव आठरे यांनी केले.

अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया

कार्यक्रमाला यांची उपस्थिती (Vichar Bharati)

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विचार भारती व जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर गौरव दिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धांच्या अंतिम फेरीचे उद्घाटन पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव अॅड.विश्वासराव आठरे होते. यावेळी पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र पाचे, विचार भारतीचे उपाध्यक्ष अनिल मोहिते, न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे, विचार भारतीचे मार्गदर्शक रवींद्र मुळे, निखील वारे, बाबासाहेब वाकळे, अशोक गायकवाड, धनंजय जाधव, चंद्रकांत तागड आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे

धनश्री विखे पाटील म्हणाल्या… (Vichar Bharati)

धनश्री विखे पाटील म्हणाल्या, अहिल्यादेवींनी केलेलं महान कार्य सर्वांपर्यंत जावे यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.  आपल्या जिल्ह्याचे नामांतर आत अहिल्यानगर झाल्याने त्यांचे विचार व कार्य आत्मसात करून त्यावर वाटचाल करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विचार भारती व जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेल्या वविध उपक्रम व स्पर्धांमधून अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर होत आहे.

हेही वाचा – आमदार होताच टक्केवारी ठरवत पथकर नाका केला चालू; आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर साजन पाचपुते यांची टीका

कार्यक्रमाचे प्रास्तविकात स्पर्धेचे संयोजक विशारद पेटकर यांनी स्पर्धेची व पारितोषिकाची माहिती दिली. अनिल मोहिते यांनी अहिल्यानगर पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती दिली. अशोक गायकवाड यांनी विचार भारतीच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा.ऐश्वर्या सागडे यांनी सूत्रसंचालन केले तर स्पर्धा संयोजक प्रा.अशोक सागडे यांनी आभार मानले. यावेळी विविध जिल्ज्यातील सहभागी स्पर्धकुपास्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here