Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणुकांची घोषणा;२६ जूनला होणार मतदान

विधानपरिषदेच्य चार जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.

0
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election

नगर : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल चार जून (4th June) रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्य चार जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी (Padavidhar Matdar Sangh) ही निवडणूक होत आहे.

नक्की वाचा : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनही फोडले   

नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात होणार निवडणूक (Vidhan Parishad Election)

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी १० जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार मतदान होणार आहे. ३१ मे ७ जूनपर्यंत अर्ज भरणार येणार आहे. १० जून रोजी अर्जाची छाननी हाेईल. १२ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी हाेईल. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.

अवश्य वाचा : झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित   

मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत सात जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांची ही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील ४ जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

३१ मे ७ जून पर्यंत अर्ज भरणार
१० जून रोजी अर्जाची छाननी
१२ जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
२६ जून रोजी मतदान होणार
१जुलै रोजी होणार मतमोजणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here