नगर : ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून बोलताना कर्नल सोफिया कुरेशींबाबत (Colonel Sophia Qureshi) चीड आणणारं वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांच्यावर जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला आता या भाजप मंत्र्याने आव्हान दिलं आहे. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल एफआयआर नोंदवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा (Vijay Shah) यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नक्की वाचा : ‘फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना कुलदैवत मानावं’-संजय राऊत
नक्की प्रकरण काय ? (Vijay Shah)
ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून बोलताना मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता. मध्यप्रदेशमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असा उल्लेख केल्याने मोठा गदारोळ सुरू झाला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांनी मंत्री विजय शहांची हकलपट्टी करण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी केली आहे.
अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?
कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याची जबलपूर उच्च न्यायालयाने दखल घेत मंत्री विजय शहांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले होते. सगळीकडून टीका झाल्यानंतर भाजप मंत्री विजय शहा यांनी आपल्या वक्तव्याबाबत लाज वाटत असल्याचं सांगत माफी मागितली. सोशल मीडियावर तसा व्हिडिओही त्यांनी टाकला होता.आता भाजप मंत्र्यानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विजय शाह काय म्हणाले होते ?(Vijay Shah)
भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.”त्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल”,असं विजय शाह म्हणाले होते.