Vijay Wadettiwar : आशा सेविकांच्या मागण्यांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक

'सरकारला आशा सेविकांची कदर नाही, आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा',अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

0
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

नगर : ‘सरकारला आशा सेविकांची कदर नाही, आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा’,अशी मागणी करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेत (Vidhansabha) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वडेट्टीवार यांनी आशा सेविकांच्या आंदोलनावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

नक्की वाचा : मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

‘आशा सेविकांची सरकारला कदर नाही’- विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)

मुंबईतील आझाद मैदानावर आशा सेविकांच्या वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. कुपोषित बालकांची सेवा करणाऱ्या आशा सेविकांची सरकारला कदर नाही, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. त्याचबरोबर सरकारने राज्यातील आशा सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली.

अवश्य वाचा : ‘द क्रू’ मध्ये करीना, क्रिती व तब्बू झळकणार; पोस्टर रिलीज

आशा सेविकांना सरकारने न्याय दिला पाहिजेविजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)

वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची आशा सेविकांची भूमिका आहे. या आशा सेविकांना सरकारने न्याय दिला पाहिजे. अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. पण ते सांगतीलं तसं कसं होईल, आर्थिक परिस्थिती पाहायला लागते. आम्ही त्यांच्याशी पुन्हा चर्चा करु, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here