Vijay Wadettiwar : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे,अशी भीती आहे.उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे.किंबहुना उद्या शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल,ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही तबल्यावर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे,असे भाकीत करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नक्की वाचा : ‘सखा’ने पटकाविला ‘अहिल्यानगर महाकरंडक’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावाला रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस ते दरे गावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. या विषयी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत टीका केली आहे.
“भांडा सौख्यभरे”असे म्हणण्याची वेळ आली आहे (Vijay Wadettiwar)
सध्याची ही सगळी परिस्थिती पाहून जनता सरकारला स्थगिती देईल.हा काय सावळा गोंधळ,ड्रामा सुरू आहे.एवढं बहुमत असताना आपसात मतभेद वाढले,सत्तेसाठी पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. शर्मेने मान खाली घालावी,अशी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे “भांडा सौख्यभरे”असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज पालकमंत्री बदलायची पाळी आली,परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल.त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल.असे ही विजय वडेट्टीवार म्हणाले.
अवश्य वाचा : इस्रोचं स्पेडेक्स मिशन यशस्वी;अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरला भारत
‘तिघांच्या भांडणात महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे’ (Vijay Wadettiwar)
विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणीचं काम झालं, लाडक्या भावांनी दाबून खाणे सुरू केलंय.त्यामुळे या बहिणीचा त्यांना श्राप लागले, हळू हळू लाभार्थी कमी होईल,बहीण त्याचा बदला घेईल. किंबहुना शेतकरी कर्जमाफी कधी होणार? तिघांच्या भांडणात महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे,अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केलीय.