Vijay Wadettiwar : महायुती म्हणजे बनवाबनवी सरकार…वडेट्टीवार यांची जोरदार टीका

Vijay Wadettiwar : महायुती म्हणजे बनवाबनवी सरकार…वडेट्टीवार यांची जोरदार टीका

0
Vijay Wadettiwar : महायुती म्हणजे बनवाबनवी सरकार…वडेट्टीवार यांची जोरदार टीका
Vijay Wadettiwar : महायुती म्हणजे बनवाबनवी सरकार…वडेट्टीवार यांची जोरदार टीका

Vijay Wadettiwar : नगर : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Elections) जनतेची फसवणूक आणि बेमानी करून बहुमत मिळवत हे महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. तुम्ही महाराष्ट्रात (Maharashtra) कुठे ही फिरले तरी जनतेच्या मनात अजिबात उत्साहात किंवा चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. सत्तेवरती असलेल्या महायुतीच्या (Mahayuti) सरकारनेच खेडेगावातील रोजगार संपवून खेडे भकास केली आहेत, अन आता हेच म्हणतात की खेड्याकडे चला, अशी जोरदार टीका विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

नक्की वाचा : लव्ह जिहाद, धर्मांतर व लँड जिहाद रोखण्यासाठी नाथ जागृती यात्रा : योगी बालकनाथ महाराज

छत्रपती शाहू महाराज व वडेट्टीवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि थोर विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार देण्यात आला. तर हरितक्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा पुरस्कार पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांना देण्यात आला. यासह सहकारातील जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.

अवश्य वाचा : अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!

वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, (Vijay Wadettiwar)

या कार्यक्रमावेळी वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यामध्ये शहरी भागातील लोकांना हिंदुत्व सांगून आणि बनवाबनवी करून हे महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. परंतु ग्रामीण भागातील तरुणांना बेरोजगार केले शेत कऱ्याच्या शेतमालाला भाव नाही आणि महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आगामी महानगरपालिका अन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर यांना विचारले असता ते म्हणाले की याबाबत आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शी चर्चा केली आहे. ते काय बोलले आहे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे ते तर त्यात दुरुस्ती करत असेल तरचांगलेच आहे असे त्यांनी यावेळी सांगितले

राज्यात महाविकास आघाडी टिकली पाहिजे आणि सर्व आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढले पाहिजे असे आमचे मत आहे अजूनही महाराष्ट्रातील जनता महाविकास आघा डीची वाट पाहत आहे ते काही बोलले असेल तर आम्ही उद्धव ठाकरे ची चर्चा करून आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्यातून मार्ग काढू अन महाविकास आघाडी टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करू असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्रात सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडीतील सर्वजण एकत्रआले होते. मात्र आता सत्ता गेल्यामुळे हे आता वेगवेगळे रस्ते शोधू लागले आहेत याबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले की, हे सर्व चोर सत्तेसाठी एकत्र आले आहे. ते जे सांगतात हे सर्व खोटं आहे. ज्यांच्यावर सीबीआय ईडी च्या धाडी पडणार होत्या त्या सर्वांचा महायुतीने गोतावळा गोळा केला आहे. ज्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते त्यांना त्यांनी जवळ केलं हे सत्तेसाठी होतं की जनतेच्या हितासाठी होतं हे त्यांनी जाहीर करावं. अशा शब्दात त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आणि टिकेला काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे बोलणं अभ्यासपूर्ण असतात त्यामुळे त्यांच्या कुठल्याही बोलण्यात महाविकास आघाडी तुटली पाहिजे असे नाही तर महाविकास आघाडी टिकली पाहिजे असे त्यांनी सांगितले.