Vijay Wadettiwar : संगमनेर : बीड म्हणजे महाराष्ट्राचा (Maharashtra) बिहार झाला आहे. बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड तयार झालेत. याठिकाणी कायदा सुव्यवस्था (Law and Order) कशी टिकणार? सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) जर स्पष्ट बोलत असतील तर सरकारने लक्ष घालावे. हे सरकार गुंडांचा बंदोबस्त करेल असे वाटत नाही. राजकारणी गुंडांना पोसताय की गुंड राजकारण्यांना पोसताय? हे महाराष्ट्राला कळेना, असा टोला माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकारला लगावला. संगमनेर येथे जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नक्की वाचा : लव्ह जिहाद, धर्मांतर व लँड जिहाद रोखण्यासाठी नाथ जागृती यात्रा : योगी बालकनाथ महाराज
यावेळी ते पुढे म्हणाले की,
शिर्डी येथे भाजपचे अधिवेशन सुरु असून त्यांनी खेड्याकडे चला असा नारा दिला आहे. महायुतीला जनतेने दिलेला कौल नाही. हे जनतेची फसवणूक करून मिळवलेले सरकार आहे. सरकार आल्यापासून जनतेत उत्साह नसल्याचे दिसत आहे. हे बेइमानीने मिळवलेलं राज्य अशी जनतेची खंत असून आता खेड्याकडे चला म्हणताय. खेडे भकास केले, खेड्यातला रोजगार संपवला. आता खेड्यातला बेरोजगार यांना जाब विचारेल. शहरातल्या लोकांना हिंदुत्व सांगून बनवाबनवी केली. महागाईने कंबरडं मोडलं, तरुण बेरोजगार रस्त्यावर आलेत. जा खेड्याकडे. मग जनता तुम्हाला दाखवेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
अवश्य वाचा : अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!
महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा (Vijay Wadettiwar)
संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केल्याच्या बाबत वडेट्टीवार यांनी संजय राऊत काय बोलले हे महाराष्ट्राने ऐकलंय. त्यात ते दुरुस्ती करत असतील तर आम्हाला आनंद. महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीची वाट बघतेय. संजय राऊत जे बोलले त्याबाबत आम्ही उध्दव ठाकरेंशी चर्चा करू. काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करू. ही आघाडी टिकावी, असा आमचा आग्रह राहणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.
भाजपने सत्तेसाठी सगळ्या चोरांना एकत्र केलेले आहे. ईडी, सीबीआय अनेक प्रकारचे आरोप असणाऱ्यांचा गोतावळा जमा केला असून भाजपच्या टिकेला कुठलाही आधार नसल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले. तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीवर नाराजी असल्याचे वक्तव्य केले. यावर उत्तर देताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, शरद पवार अभ्यासपूर्ण बोलतात. त्यांचे वक्तव्य आम्ही ऐकले आहे. महाविकास आघाडी मजबूत व्हावी असेच विचार त्यांनी मांडले आहेत, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.